कौन्सिल ऑफ एज्युकेशन च्या पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर मध्ये १५ ऑक्टोबर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. हा दिवस ‘ वाचन प्रेरणा दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. कॉलेजचे प्राचार्य बी. डी. कुलकर्णी सर यांनी प्रतिमेचे पूजन केले व डॉ. ए. पी. जे कलाम यांच्या बद्दल थोडक्यात पण महत्वपूर्ण माहिती दिली. त्यानंतर कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले होते. त्या दुर्मीळ ग्रंथाच्या वाचनाचा लाभ सर्व स्टाफ व विद्यार्थ्यांनी घेतला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार ग्रंथपाल सौ. शुभांगी पाटील यांनी मानले.