Skip to content

१२ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस उत्साहात साजरा

पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग कोल्हापूर मधील ग्रंथालयामध्ये 12 ऑगस्ट हा दिवस डॉक्टर एस आर रंगनाथन यांचा जन्मदिवस 134 वी जयंती राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस म्हणून साजरा केला जातो ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून एस आर रंगनाथन यांना ओळखले जाते त्यानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले त्यांच्या कार्याविषयीची माहिती ग्रंथपाल सौ. शुभांगी पाटील यांनी सर्वांना दिली. अशा पद्धतीने 12 ऑगस्ट हा दिवस “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस” म्हणून साजरा करण्यात आला.

जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त पथनाट्य व तज्ज्ञ मार्गदर्शनाद्वारे जनजागृती उपक्रमाचे यशस्वी आयोजन

पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर येथे २८ जुलै २०२६ रोजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत “Hepatitis Let’s break it down” या संकल्पनेवर आधारित जागतिक हिपॅटायटिस दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम दोन सत्रांत पार पडला; सकाळी १०:३० ते ११:३० दरम्यान बिंदू चौक येथे कु. प्रियंका यांच्या सूत्रसंचालनाखाली जीएनएम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे हिपॅटायटिस आजाराची लक्षणे, प्रसार आणि प्रतिबंध याविषयी जनजागृती केली, ज्याचा आभारप्रदर्शन कु. सलमा जमादार यांनी केले. त्यानंतर दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत कॉलेजच्या सभागृहात प्राचार्य प्रोफेसर चिदानंद पी यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला, जिथे डॉ. सोनिया एस यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) थीमची माहिती दिली आणि प्रमुख वक्ते डॉ. दिग्विजय चव्हाण (मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट) यांनी हिपॅटायटिस B व C, संसर्ग नियंत्रण, सुई टोचल्यामुळे होणाऱ्या दुखापती (NSI) आणि पोस्ट-एक्सपोजर प्रोफिलेक्सिस (PEP) यावर सविस्तर मार्गदर्शन केले. हा उपक्रम अतिशय माहितीपूर्ण ठरला असून कु. सलमा जमादार यांच्या आभारप्रदर्शनानंतर संस्था प्रार्थना व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

आषाढी एकादशी निमित्त कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन

दि. 25 जुलै 2026 आषाढी एकादशी निमित्त, कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, मगदुम एन्डो सर्जेरी सेन्टर व श्री. विठ्ठल रुक्मिणी सांस्कृतिक मंदिर व सामाजीक मंडळ, श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी मंदिराचे प्रमुख अध्यक्ष श्री. दत्ताजीराव वारके, सदस्य श्री. सुनील कोळी, श्री. किशन लांबोळे, श्री. संदीप पाटील, श्री. मारुतीराव शिंदे, श्री. राजेंद्र वारके तसेच पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग चे प्रा. चिदानंद पाटील, ऐडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर श्री. नितीन मिसळ, डॉ. संतोष धनवडे, डॉ. योगिता नाईक, कु. ऋजुता सावंत, कु. योगिता बांदेकर, आणी नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थिनी आदी उपस्थित होते. या मोफत आरोग्य शिबिरास भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. सदर आरोग्य शिबीर यशस्वी होण्यामागे आपल्या कौन्सिल ऑफ एज्यकेशन चे सचिव मा. डॉ. विश्वनाथ मगदूम सर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) वर्धापन दिन उत्साहात साजरा

कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित पर्वतिदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग येथे आज महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), नाशिक यांचा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. चिदानंद के. पाटील तसेच प्राध्यापक मा. श्री. भालचंद्र डी. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान विद्यापीठाच्या शैक्षणिक परंपरा, मूल्ये आणि आरोग्य शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी विद्यापीठाच्या भावी प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आणि कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

जागतिक तंबाखू विरोधी दिन सोहळा २०२६

कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलितपार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंगच्या बेसिक बी.एस्सी. नर्सिंग द्वितीय सत्र आणि जीएनएम प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ३१ मे २०२६ रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला. हा जनजागृती कार्यक्रम कोल्हापूरमधील मगदूम एंडोसर्जरी हॉस्पिटल, साई कार्डियाक हॉस्पिटल आणि सिटी हॉस्पिटल यांसारख्या नामांकित रुग्णालयांमध्ये आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी रुग्ण, अभ्यागत आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि तंबाखूमुक्त जीवन जगण्याचे महत्त्व याबद्दल शिक्षित करण्यात सक्रिय सहभाग घेतला. जीएनएम नर्सिंग प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तंबाखूजन्य आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटर हॉस्पिटलने आयोजित केलेल्या मानवी साखळी निर्मितीमध्ये भाग घेतला. बी.एस्सी. नर्सिंग द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांनी रुग्णालयातील अभ्यागत, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसमोर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा वापर न करण्याची शपथ घेतली. तंबाखूजन्य आजार आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आरोग्य शिक्षण सत्रे, जनजागृतीपर चर्चासत्रे आणि माहितीपूर्ण संवादांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. विश्वनाथ मगदूम सरांच्या मौल्यवान मार्गदर्शनाखाली आणि पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूरचे प्राचार्य चिदानंद पाटील सर व सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहनाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. त्यांच्या पाठिंब्याने आणि प्रेरणेने विद्यार्थ्यांना सार्वजनिक आरोग्य जागृतीसाठी प्रभावीपणे योगदान देण्यास स्फूर्ती मिळाली. या सोहळ्यामुळे समाजात जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली आणि आरोग्य संवर्धन व रोग प्रतिबंधाप्रती नर्सिंग विद्यार्थ्यांची वचनबद्धता अधिक दृढ झाली.

पार्वतीदेवी कुंभार यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष उपक्रम

कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर येथे स्व. पार्वतीदेवी कुंभार यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा व त्यागमय जीवनप्रवासाचा गौरव करण्यात आला. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दिलेल्या खंबीर साथीस विशेष अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. प्राचार्य चिदानंद पाटील यांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी त्यांच्या सामाजिक जाणिवांचा आदर्श मांडला. यावेळी समाजसेवा व स्त्रीशक्तीचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने बालकल्याण संकुलास रुपये ७०००/- ची देणगी प्रदान करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागतिक क्षयरोग दिन

कौन्सिल ऑफ एज्युकेशन च्या पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर येथे क्षयरोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याच्या निर्मूलनासाठीच्या जागतिक प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी दरवर्षी २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो.पार्वतीदेवी कुंभार महाविद्यालयात जागतिक क्षयरोग दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य श्री. चिदानंद पाटील, प्रा. भालचंद्र कुलकर्णी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या स्वागताने झाली. बी. एस्सी. नर्सिंगच्या चौथ्या सत्रातील विद्यार्थी कुमार. अंकित भोसले आणि कुमारी सानिका पाटील यांनी क्षयरोगाची कारणे, लक्षणे, निदान, उपचार आणि प्रतिबंध यावर सादरीकरण केले. त्यानंतर प्रा. भालचंद्र कुलकर्णी यांनी जागतिक क्षयरोग दिनाच्या संकल्पनेवर मार्गदर्शन केले. त्यांनी क्षयरोगाचे निर्मूलन आणि त्यासंबंधित कलंक कसा कमी करायचा यावर विशेष भर दिला. कार्यक्रमाचे परिणाम: हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवण्यात यशस्वी ठरला. सहभागींना क्षयरोगाचा प्रतिबंध, उपचार आणि औषधोपचाराचे पालन करण्याच्या महत्त्वाविषयी ज्ञान मिळाले. या उपक्रमांमुळे क्षयरोगाशी संबंधित गैरसमज आणि कलंक कमी होण्यासही मदत झाली.  

कर्मचारी विकास कार्यक्रम

कौन्सिल ऑफ एज्युकेशन’च्या पार्वतीदेवी कुंभार नर्सिंग महाविद्यालयाने (कोल्हापूर) आपल्या अध्यापन कर्मचाऱ्यांची व्यावसायिक क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने ‘कर्मचारी विकास कार्यक्रम’ (Staff Development Programme) यशस्वीरित्या आयोजित केला.  या प्रसंगी, प्रा. भालचंद्र कुलकर्णी यांनी ‘परीक्षा प्रक्रिया आणि मूल्यमापन मार्गदर्शक तत्त्वे’ या विषयावर एक अत्यंत उद्बोधक व्याख्यान दिले. परीक्षा आयोजित करण्याच्या पद्धतशीर कार्यपद्धतींचे त्यांनी सविस्तर विवेचन केले; तसेच या प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि निर्धारित नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या महत्त्वावर त्यांनी विशेष भर दिला. शैक्षणिक गुणवत्ता आणि संस्थेची प्रतिष्ठा (अखंडता) टिकवून ठेवण्यामध्ये प्रभावी व निःपक्षपाती मूल्यमापन पद्धती कशा महत्त्वाची भूमिका बजावतात, हे देखील त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमादरम्यान, डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी अध्यापन कार्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्याबाबत प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. समकालीन शिक्षणाला साजेस्या अशा नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींवर लक्ष केंद्रित करत, अधिक प्रभावी आणि रंजक व्याख्याने देण्यासाठी त्यांनी प्राध्यापकांना व्यावहारिक अंतर्दृष्टी आणि मोलाच्या टिप्स दिल्या. हा कार्यक्रम सर्व सहभागींसाठी अत्यंत माहितीपूर्ण आणि फायदेशीर ठरला. यामुळे अध्यापन कर्मचाऱ्यांची परीक्षाविषयक कार्यपद्धती (प्रोटोकॉल्स) आणि आधुनिक अध्यापन दृष्टिकोन यांविषयीची समज लक्षणीयरीत्या वाढली, ज्यामुळे संस्थेच्या एकूणच शैक्षणिक उत्कृष्टतेमध्ये मोलाची भर पडली. या कार्यक्रमात सर्व प्राध्यापकांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला; यावरून संस्थेची सततचा व्यावसायिक विकास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाप्रती असलेली कटिबद्धता स्पष्टपणे दिसून आली.

जागतिक किडनी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

कौन्सिल ऑफ एज्युकेशन च्या पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर येथे जागतिक किडनी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता कॉलेजच्या प्रवेशद्वारापासून काढण्यात आलेल्या रॅलीने झाली. ही रॅली बिंदू चौक येथे पोहोचल्यावर बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी किडनीचे महत्त्व समजावून सांगणारे पथनाट्य सादर केले. त्यानंतर रॅली दसरा चौक मार्गे पुन्हा कॉलेजमध्ये परत आली. रॅलीनंतर कौन्सिल ऑफ एज्युकेशन चे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी किडनीचे आजार व त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग चे प्राचार्य चिदानंद पाटील व प्राध्यापक भालचंद्र कुलकर्णी तसेच डी.आर.के. कॉलेज ऑफ कॉमर्स च्या प्राचार्या तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष उपक्रम

कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व तज्ज्ञांचे मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात हास्ययोग सत्राने झाली. योगा प्रशिक्षक प्रा. मनीषा शिंदे यांनी उपस्थितांना हास्ययोगाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये रक्तदाब, हिमोग्लोबिन, रक्तातील साखर तसेच इतर आवश्यक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निरुपमा सखदेव यांनी “महिलांचे आरोग्य समस्या आणि उपाययोजना” या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कावेरी चौगुले यांनी “महिलांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या आणि उपाययोजना” या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. चिदानंद पाटील व प्रा. भालचंद्र कुलकर्णी यांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांना गुलाब फुल देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मराठी भाषा गौरव दिन विशेष उपक्रम

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कॉन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग येथे ग्रंथपाल सौ. शुभांगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात विविध विषयांवरील मराठी पुस्तके विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. यासोबत मराठी भाषेवर आधारित विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. हे खेळ महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. नितीन मिसाळ यांनी घेतले. यात इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ सांगणे, समानार्थी शब्द ओळखणे व प्रश्नोत्तर खेळांचा समावेश होता. या कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. चिदानंद पाटील यांनी मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. हा उपक्रम ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरला.

जागतिक कर्करोग दिनानिमित्त नर्सिंग विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर, मध्ये जागतिक कर्करोग दिन निमित्त कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीतून कर्करोग प्रतिबंध, वेळेवर निदान व उपचाराबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. या जनजागृती रॅलीत कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, महाविद्यालयाचे प्राचार्य भालचंद्र कुलकर्णी, चिदानंद पाटील, कॉमर्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. रविकुमार नाईक, नाइट कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. सुरेश फराकटे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. फलक, घोषवाक्ये आणि संदेशांच्या माध्यमातून कर्करोगाविषयी जनजागरण करण्यात आले. रॅलीनंतर आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात CuraLife Cancer Centre, Kolhapur येथील कर्करोगतज्ज्ञ डॉ. अक्षय शिवछंद यांनी कर्करोग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, जीवनशैलीतील बदल, वेळेवर तपासणीचे महत्त्व तसेच कर्करोग झाल्यास घाबरून न जाता उपलब्ध वैद्यकीय उपचारपद्धतींबाबत सविस्तर माहिती दिली. 

पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंगमधील HPV लसीकरण मोहीम

दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी कौन्सिल ऑफ एज्युकेशन च्या पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर येथे विद्यार्थिनींसाठी HPV लसीकरण मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) संसर्ग प्रतिबंधाबाबत जनजागृती करणे व महिलांच्या आरोग्य संवर्धनास प्रोत्साहन देणे हा होता. विद्यार्थिनींच्या सक्रिय सहभागामुळे ही लसीकरण मोहीम सुरळीतपणे पार पडली असून, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा व सार्वजनिक आरोग्याबाबत संस्थेची बांधिलकी यामधून अधोरेखित होते.

नर्सिंग कॉलेजमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कौन्सिल ऑफ एज्युकेशन च्या पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर मध्ये ३ जानेवारी २०२६ रोजी  जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे  प्राचार्य बी. डी. कुलकर्णी सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 
 
 

जागतिक एड्स दिनानिमित्त नर्सिंग विद्यार्थ्यांची जनजागृती मोहीम

कौन्सिल ऑफ एज्युकेशन च्या पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर मध्ये १ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना एच.आय.व्ही./एड्सबाबत योग्य माहिती, प्रतिबंधक उपाय आणि समाजातील गैरसमज दूर करणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात कौन्सिल ऑफ एज्युकेशन चे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाली. त्यांनी एड्सविषयी असलेले गैरसमज, युवकांची जबाबदारी आणि सुरक्षित जीवनशैली याविषयी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.विद्यार्थ्यांनी, घोषवाक्ये आणि माहितीपर उपक्रमाद्वारे जनजागृतीचा संदेश दिला.

नर्सिंग कॉलेज मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणादिन म्हणून साजरी

 
कौन्सिल ऑफ एज्युकेशन च्या पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर मध्ये १५ ऑक्टोबर २०२५  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. हा दिवस ‘ वाचन प्रेरणा दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. कॉलेजचे प्राचार्य बी. डी. कुलकर्णी सर यांनी प्रतिमेचे पूजन केले व डॉ. ए. पी. जे कलाम यांच्या बद्दल थोडक्यात पण महत्वपूर्ण माहिती दिली. त्यानंतर कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले होते. त्या दुर्मीळ ग्रंथाच्या वाचनाचा लाभ सर्व स्टाफ व विद्यार्थ्यांनी घेतला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार ग्रंथपाल सौ. शुभांगी पाटील यांनी मानले.